खाद्य पदार्थ विक्री स्टॉलचे
सांडपाणी पादचारी मार्गावर

खाद्य पदार्थ विक्री स्टॉलचे सांडपाणी पादचारी मार्गावर

पिंपरी, ता. १५ ः निगडीतील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ विक्रीच्या स्टॉलचे सांडपाणी पादचारी मार्गावर येत असल्याने येथून चालताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. तसेच, सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या उड्डाणपुलाखाली विविध प्रकारचे तीस ते चाळीस स्टॉल आहेत. तसेच, पीएमपीचा बीआरटी बस थांबाही जवळच आहे. या स्टॉल जवळूनच बस थांब्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या पीएमपी थांब्यावरून विविध मार्गांच्या बस सुटतात. त्यामुळे या बस थांब्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक असते. प्रवाशांच्या सोयीसाठी या थांब्याकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने पादचारी मार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, येथील स्टॉलचे सांडपाणी या पादचारी मार्गावर येत असते. त्यामुळे येथील पेव्हिंग ब्लॉक उखडले असून तेथे पाणी साचून चिखल होतो. यासह दुर्गंधीही पसरते. पाय घसरून पडण्याची भितीही निर्माण होते. तरी येथील स्टॉल धारकांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com