Pimpri Crime News
Pimpri Crime News Sakal

Pimpri Crime News : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दोन तासात बेड्या

राग मनात धरून हर्षल सोनवणे याने श्याम चौधरी व कीर्तीकुमार लिलारे याच्यासोबत कट रचला.

पिंपरी : व्‍यावसायिक वादातून गोळीबार करणाऱ्या आरोपीसह त्‍याच्‍या साथीदारांना अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. १२ मे रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अजय फुले यांच्‍या फिर्यादीवरून हर्षल सोनावणे याच्‍यासह दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी हर्षल सोनावणे व फुले या दोघांचेही जाधववाडी परिसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने असून, त्यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक वाद होते. याचा राग मनात धरून हर्षल सोनवणे याने श्याम चौधरी व कीर्तीकुमार लिलारे याच्यासोबत कट रचला.

आरोपी चौधरी व लिलारे यांनी वाद मिटविण्याच्या बहान्याने जाधववाडी ते पंतनगर रस्‍त्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ घेऊन गेले. तेथे चर्चा करतताना नियोजित कटानुसार हर्षल सोनावणे आला. कमरेला असलेले पिस्टल काढून तीन गोळ्या फिर्यादीवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी फिर्यादीच्‍या दंडाला लागून गेली. दुसरी गोळी सहआरोपी कीर्तीकुमार लिलारे याच्या मानेला लागली.

गोळीबाराची माहिती मिळताच चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून जखमी अजय सुनील फुले (वय. १९) यांच्‍याकडे विचारपूस केली. फुले यांच्‍या तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्‍या अधिपत्याखाली चिखली पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे व तपास पथक, गुन्हे शाखा, युनिट-१ चे पोलिस निरीक्षक गोरक्ष कुंभार यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अधारावर आरोपींना बेड्या ठोकल्‍या. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्‍त (गुन्हे शाखा) संदीप डोईफोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com