पिंपरी गुन्‍हे वृत्‍त

पिंपरी गुन्‍हे वृत्‍त

साडेचार लाखांच्‍या दागिन्‍यांसह पर्स चोरीला
पिंपरी : साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांसह प्रवासी महिलेची पर्स चोरीला गेली. ही घटना रविवारी (ता.१२) रात्री ताथवडे येथे घडली. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबईवरून सांगलीला एका खासगी ट्रॅव्हल्सने निघाल्या होत्या. ताथवडे येथे एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबली. फिर्यादी यांनी त्यांची पर्स त्यांच्या सीटवर ठेवली होती. त्या परत आल्या असता तिथून त्यांची पर्स चोरीला गेली होती. पर्समध्ये ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते.

टेम्‍पोच्‍या धडकेत पादचाऱ्याचा मृत्‍यू
पिंपरी ः मोशी येथे टेम्पोच्या धडकेत सीताराम खत्रुजी उईके (वय ७७, रा. मोशी) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रवींद्र सीताराम उईके (वय ४१, रा. बोपखेल) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक परेश सोमाभाई पटेल (वय ४५, रा. गुजरात) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम उईके हे पायी घरी चालत जात होते. त्यावेळी मोशीकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावर आरोपीने त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेमध्ये ‍त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्‍यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com