पोलिस असल्याची बतावणी; तिघांकडून रोकड लंपास

पोलिस असल्याची बतावणी; तिघांकडून रोकड लंपास

पिंपरी, ता. १६ : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करून तपासणीच्या बहाण्याने तिघांकडून ३३ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघेजण पसार झाल्याची घटना पिंपरी पुलाजवळ घडली.
या प्रकरणी सोहेल गुलफाम खान (रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह कपडे खरेदी करण्यासाठी रिक्षाने पिंपरीकडे निघाले होते. त्यावेळी ते नेपाळी मार्केट पिंपरी पुलावर आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. ‘‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलिस आहोत, तुम्ही गांजाची विक्री करता. तुमच्या खिशात गांजा आहे. तुमच्या खिशातील साहित्य बाहेर काढा’’, असे सांगितले.
त्यानुसार, फिर्यादी यांनी खिशातील साहित्य बाहेर काढले असता फिर्यादी यांच्याकडून तेरा हजार रुपये व त्यांच्या दोन्ही मित्रांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये असे ३३ हजार रुपये घेऊन आरोपी तिथून पसार झाले. दरम्यान, ते पोलिस नसून त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com