

शहरातील ४० शाळा
ठरल्या ‘शंभर नंबरी''
पिंपरी, ता. २१ ः पिंपरी-चिंचवड शहरातील चाळीस कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ शाळांची शंभर टक्के निकालात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी यंदा गुणांमध्ये चांगलीच आघाडी मारली. शहरातील शाळांनीदेखील स्वतःची कामगिरी उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनी देखील घवघवीत यश मिळवले आहे. बहुतांश शाळांनी ‘शंभर नंबरी’ यश संपादित केले आहे. त्यामुळे निकालानंतर शहरातील शाळांमध्ये सेलिब्रेशनचे वातावरण होते. गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित शाळांचेच वर्चस्व दिसून यायचे. पण यंदा नव्याने आलेल्या शाळांचीही कामगिरी उंचावल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यासोबतच ‘टेस्ट सीरिज’ घेण्याकडे शाळांचा कल दिसून आला. तर बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याकडे लक्ष दिले.
शंभर टक्के गुण मिळविलेल्या शाळा
-जयहिंद हायस्कूल, पिंपरी
-वाणिज्य, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान ज्युनिअर कॉलेज, पिंपरी
-गोदावरी हायस्कूल चिंचवड
- के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज चिंचवड स्टेशन
-मॉडर्न हायस्कूल यमुनानगर
- श्रीमती संजूबेन अजमेरा हायस्कूल ,अजमेरा कॉलनी पिंपरी
-जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल , खडकी
- निर्मल बेथानी हायस्कूल, काळेवाडी
- शिवभूमी विद्यालय यमुनानगर
- अमृता ज्युनिअर कॉलेज यमुना नगर निगडी
- सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी
-कमल नयन बजाज ज्युनिअर कॉलेज, संभाजीनगर
-सरस्वती विश्वविद्यालय ज्युनिअर कॉलेज, निगडी
- पी. बी. जोग हायस्कूल, मोरया कॉलनी, चिंचवड
-अभिषेक आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, शाहूनगर
-श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज, भोसरी
-सेंट अँन्स ज्युनिअर कॉलेज, त्रिवेणी नगर निगडी
सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेज, निगडी
- लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेज, जुनी सांगवी
- क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी
-सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय रावेत
- विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट ज्युनिअर कॉलेज चिखली
-नॉवेल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स
-एस. एन. बी. पी कॉलेज चिखली
- सी. एम. एस. इंग्लिश मीडियम निगडी
- कॉमर्स सायन्स इन्फोटेक्निकल ज्युनिअर कॉलेज
-प्रियदर्शिनी ज्युनिअर कॉलेज भोसरी
-एपीजे कॉलेज सायन्स कॉमर्स, वाकड
-ओॲसिस इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भोसरी
- एम एस एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज काळेवाडी
-विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिखली
- गणेश इंग्लिश गणेश इंग्लिश मीडियम स्कूल चिखली
-आर आय सी इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज भोसरी
शिवभूमी इंग्लिश मीडियम स्कूल
पीसीएमसीआयटीआय मोरवाडी
-गव्हर्नमेंट आयटीआय पीसीएमसी
श्री फत्तेचंद जैन विद्यालय ज्युनिअर कॉलेज चिंचवड स्टेशन
-आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालय ,चिंचवड बिजलीनगर
-नावेल वोकेशनल ज्युनिअर कॉलेज संभाजीनगर
-इंद्रायणी ओकेशन ज्युनिअर कॉलेज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.