आगीच्या घटनेत पोलिसाने वाचवले ज्येष्ठ महिलेचे प्राण

आगीच्या घटनेत पोलिसाने 
वाचवले ज्येष्ठ महिलेचे प्राण
Published on

पिंपरी, ता. २१ : शाहूनगर येथील इमारतीत आग लागलेल्या फ्लॅटमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ महिलेला पोलिस अंमलदार तानाजी दयानंद बनसोडे यांनी खांद्यावर घेत सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील अंमलदार तानाजी बनसोडे व मच्छिंद्र चिंतू टिके हे बिट मार्शल ड्यूटीवर असताना सोमवारी दुपारी त्यांना शाहूनगर येथील एचडीएफसी क्लोनीजवळील अरण्यम सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर येत होते. बनसोडे व टिके यांनी सुरुवातीला एमएनजीएल गॅसच्या जोडणीचे पाइपलाइन कनेक्शन बंद केले. तसेच बनसोडे हे आग लागलेल्या फ्लॅटमध्ये गेले असता तेथे एक ज्येष्ठ महिला मदतीची वाट पाहत असल्याचे दिसले. त्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खांद्यावर घेतले व बाहेर पडू लागले. दरम्यान, तेथेच त्यांना एक गॅस सिलिंडर दिसला. या सिलिंडरमुळे स्फोट होऊन आग भडकण्याची शक्यता असल्याने त्यांनी एका खांद्यावर वृद्धा असताना दुसऱ्या हातात सिलिंडर घेऊन त्यांना सुखरुपरित्या पार्किंगमध्ये आणून सोडले.
आगीच्या भीतीने टेरेसवर गेलेल्या रहिवाशांनाही बनसोडे यांनी सुखरूप इमारतीच्या खाली आणून सोडले. या कामगिरीबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलिस अंमलदार तानाजी बनसोडे व मच्छिंद्र टिके यांना प्रशस्तिपत्रक देवून गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com