गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
पिंपळे निलख : जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली. कृष्णाकुमार उपेंद्र पासवान (रा. विनायकनगर, पिंपळे निलख) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम मानमोडे (रा. पिंपळे निलख), संकेत थोरात (रा. वाकड) व त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. दीड महिन्यांपूर्वी शुभम याने फिर्यादीचा भाऊ सचिन पासवान यास तंबाखू मागितले असता त्याने तंबाखू दिली नाही. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्या कारणावरून चिडून शुभम याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. तसेच, संकेत याने फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि दुचाकीची तोडफोड केली.
----------------------------
मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याने एकाला बेदम मारहाण
पिंपरी : मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एकाला रॉडने तसेच दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली.
संतोष भीमा विधाते (रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील शिवाजी जाधव (वय २८), अनिल शिवाजी जाधव (वय २६), शिवाजी जाधव (वय ५०), दीप जावळे (वय ३०, सर्व रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याचा राग आरोपींना होता. यावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या दोन्ही पायावर रॉडने मारून तसेच पाठीत व हातावर बॅट व दांडक्याने मारहाण करून फिर्यादी यांना जखमी केले.
---------------------
साडे आठ लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत तरुणाची आठ लाख ७४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. पुनावळे येथील तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला व्हॅट्सॲपवरील एका ग्रुपमध्ये ॲड करून एक ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. या अपमध्ये गुंतवणूक केल्यास दोन महिन्यात परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देवून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून आठ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली.

तरुणाची बावीस लाखांची ऑनलाइन फसवणूक
थेरगाव : गुंतवणुकीवर मोठ्याप्रमाणात नफा होत असल्याचे आमिष दाखवून परतावा न देता तरुणाची ऑनलाईनद्वारे बावीस लाख रुपयांची फसवणूक कऱण्यात आली.
थेरगाव येथील तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार रवी तोमर (वय २८), करणवीर ढिल्लोन (वय २६), अभिजित ठाकूर (वय २७), नीलमा चौहान (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. समाज माध्यमांद्‍वारे एक जाहिरात टाकून त्यावर व्हाट्सअॅप ग्रुपची लिंक टाकून त्याद्वारे फिर्यादीला ग्रुप जॉइन करायला लावले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट, स्टॉक, आयपीओ मध्ये मोठ्याप्रमाणात नफा होत असल्याचे भासवले. एक ॲप डाऊनलोड करायला भाग पाडून जास्तीचा नफा भेटण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या बँक खात्यावर पैशांची गुंतवणूक करण्यास सांगून त्या बँक खात्याद्वारे पैसे एका ॲपमध्ये जमा झाल्याचे व त्याद्वारे ट्रेडिंग सुरु असल्याचे व मोठ्या प्रमाणात नफा होत असल्याचे फिर्यादीला भासवले. मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्याचे आमिष दाखवून फिर्यादीची बावीस लाख पंधरा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com