विविध शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत चमकले

विविध शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत चमकले

पिंपरी, ता.१ ः श्री फत्तेचंद जैन विद्यालय, सीएमएस हायस्कूल, ब्लॉसम पब्लिक स्कूल, श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल, श्री टागोर विद्यालय, श्रीमती शांतीदेवी जयसिंग हुजा गुरुनानक हायस्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी नोंदविली.

श्री टागोर माध्यमिक विद्यालय
इंद्रायणीनगर येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. समर्थ मुरमे (९५ टक्के), सानिका कदम (९३ टक्के), कीर्ती माने (९१ टक्के), श्रेया पैठणकर (९०.८० टक्के), दिव्या भोंडवे, साक्षी मदने, आदित्य यादव, सचेत थोरात, वैभव असलकर (९० टक्के), स्नेहल पाटील, संजना उबाळे, रेहन पठाण (८९ टक्के) यांनी उत्तम गुण मिळवले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे-पाटील, मुख्याध्यापक संतोष काळे, हनुमंत आगे, मुख्याध्यापक उद्धव ढोले, मुख्याध्यापिका मनीषा गुरव, शशिकांत ताठे, दिलीप पाटील, सहशिक्षक सुलाखे संतोष, रवी खंदारे, विठ्ठल बुळे, माया पाटोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.४८ टक्के लागला. शार्दूल जैन (९१.८० टक्के), इमरान शेख (९१.४० टक्के), ओंकार बोरगावकर (९०.४० टक्के) गुण मिळवले आहे. राजेंद्र मुथा, प्रा.अनिल कांकरिया, प्राचार्य सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया, पर्यवेक्षक संजीव वाखारे, मनीषा कलशेट्टी, निर्मला चव्हाण व सुनील चोरडिया यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल
दापोडी येथील इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. शाळा व्यवस्थापनातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षकवर्ग, शाळा समिती आणि पालक यांच्या सहकार्याने तेराव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश आले.

श्री सयाजीनाथ विद्यालय
चऱ्होली येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाचा ९९.६३ टक्के निकाल लागला. जिया कंक, सिद्धी मुक्कामवार, सिद्धी इंगोले (९५.४० टक्के), सुरेश निंबाळकर (९५.४० टक्के) शुभम चव्हाण (९३.६० टक्के) यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड, सदस्य प्रा.अलका पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्रीमती शांतीदेवी जयसिंग हुजा हायस्कूल
नवी सांगवीतील श्रीमती शांतीदेवी जयसिंग हुजा गुरुनानक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. तन्वी काटे (९४ टक्के), अस्मिता वासी (९३.६० टक्के), किरण बारटक्के (९२.६०टक्के), समृद्धी झोरे (९१.२० टक्के), दीप सपारिया (९०.६० टक्के) यांनी उल्लेखनीय यश मिळविले. शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, खजिनदार कविता गोरे, सरचिटणीस प्रा.सुभाष जावळे, सहसचिव रवींद्रनाथ नवले, सहाय्यक सचिव राजेंद्र खरमाटे, प्रा. प्रदीपकुमार नागवडे, ग्रामीण संचालक हेमंत तांबे, बाळासाहेब पोळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सौ. ताराबाई मुथा प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.५८ टक्के इतका लागला. मानसी लोहकरे (९७ टक्के), तनिष्का सरनोबत (९६.६० टक्के), ऋतुजा बारस्कर, ऋतुजा चलवादी (९४.८० टक्के) यांनी उत्तम यश संपादन केले. ऋतुजा चलवादी, अनुराधा डोके, ऋतुजा बारस्कर, ऋतुजा माहूरकर यांनी संस्कृत विषयात १०० गुण मिळविले. प्रशालेच्या प्राचार्य सारंगा भारती, उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, पर्यवेक्षक दीपक थोरात यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सीएमएस हायस्कूल
निगडी येथील सीएमएस हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. अनुष्का पोळ ( ९७.६० टक्के), अनिशा काळे (९७.४० टक्के), यश पवार (९६.४० टक्के), तनिशा भालेराव (९६.४० टक्के),
यज्ञेश वागवकर (९५.६० टक्के), दिव्या अहिरे(९५.४० टक्के), सौम्या दुबे (९५.४० टक्के) यांनी उत्तम गुण मिळविले. विज्ञानात करण भोसले (८८ टक्के), क्रिश राजपूत (८४.३३ टक्के), सृष्टी सरमाने (८३.५० टक्के), सुजल खोत (८२.३३ टक्के), हमूद खान (८२.३३ टक्के), शर्वरी झोड (८०.८३ टक्के), सृष्टी पवार (९२.८३ टक्के), श्रावणी कुलकर्णी (८४.६७ टक्के), पूर्वा सप्रे (८४.५ टक्के), वर्षा शंकबंदी (८२.१७ टक्के) यांनी चांगले गुण मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचे मल्याळी समाजचे अध्यक्ष टीपी विजयन, सचिव सुधीर नायर, खजिनदार पी. अजयकुमार, मुख्याध्यापिका डॉ. बीजी गोपकुमार, चैताली लोंढे यांनी अभिनंदन केले.

ब्लॉसम पब्लिक स्कूल
ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदविला. बारावीच्या परीक्षेत ग्रीन्स त्रिभुवनकुमार साह (९३.४ टक्के) याने तर दहावीमध्ये भाविनी बेकवाडकर (९९ टक्के) हिने गुण प्राप्त केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष... यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या स्वाती आरु, उपप्राचार्या दीपा पवार यांनी मार्गदर्शन केले.

श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा दहावीच्या परीक्षेचा ९४.२८ टक्के निकाल लागला. निखिल कांबळे (९०.६० टक्के), विजयाराणी सूर्यवंशी (८९.८० टक्के), भाग्यश्री धुंदळे (८९.६० टक्के) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले, शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल शेवाळे, कपिल राऊतमारे, रेखा लोखंडे, संध्या पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एम.एम.विद्यामंदिर
काळेवाडी येथील एम.एम. विद्यामंदिर (माध्यमिक) ९९.२३ टक्के निकाल लागला आहे. बालाजी राठोड (९६.४० टक्के), वरद जंगम (९५.६० टक्के), सुमीत मिरकले (९४.६० टक्के) उत्तम गुण मिळविले.

लक्ष्मीबाई नांदगुडे हायस्कूल
विशालनगर, पिंपळे निलख येथील लक्ष्मीबाई नांदगुडे हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागला.

संचेती माध्यमिक विद्यालय
थेरगावातील संचेती माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. विवेक देसाई (९१ टक्के), नीलेश गायकवाड (९०.८० टक्के), श्रावणी काशीद (९०.४० टक्के), श्रेयस बनसोडे (९० टक्के), साक्षी शिंदे (८८.६० टक्के) यांनी यश मिळविले. मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार, मोहनलाल संचेती, संस्थेच्या सचिव वर्षा टाटिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर
इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. ज्ञानेश्वरी सांडभोर (९५.८० टक्के), ईश्वरी यादव (९५.६० टक्के), अनुष्का बारस्कर, पूनम अहिरराव (९५.६० टक्के) यांनी घवघवीत यश मिळविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com