सोमाटणे, परंदवाडीतील नर्सरी व्यवसाय ‘कोमेजला’

सोमाटणे, परंदवाडीतील नर्सरी व्यवसाय ‘कोमेजला’

सोमाटणे, ता.२ ः बाजारपेठेत फुलांची मागणी घटल्याने नर्सरी व्यवसाय तोट्यात आला असून भाडेतत्वावर जमिनी घेऊन व्यवसाय करणाऱ्यांवर हा व्यवसाय अन्यत्र हलविण्याची वेळ आली.
नर्सरी व्यवसाय हा चांगला पैसा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. मुबलक पाणी, दोन्ही महामार्गांच्याजवळील गाव असल्याने दळणवळणाची सोय, व्यवसायास पोषक वातावरण, मजुरांची उपलब्धता, राज्यासह परराज्यात रोपांना असलेली मागणी, आणि सहजच भाडेतत्वावर मिळणाऱ्या जमिनी आदी कारणांमुळे गेल्या दोन दशकांत सोमाटणे, परंदवडी परिसरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे, नर्सरी व्यवसायाची शंभरावर संख्या गेली. चांगला पैसा मिळवून देणाऱ्या या व्यवसायाला कोरोना काळात खिळ बसली. अन् मजूरही आपल्या गावी गेल्याने या व्यवसायाची तोट्याकडे वाटचाल सुरु झाली. गेल्या दोन वर्षांत हा व्यवसाय केवळ खर्च भागवण्यापुरताच होत असल्याची नर्सरी व्यावसायिकांची व्यथा आहे. आज ना उद्या मागणी वाढेल, या आशेवर सध्या हा व्यवसाय सुरु असल्याचे मत नवनाथ मुऱ्हे यांनी व्यक्त केले. हा व्यवसाय बांधकाम, शेतीवर अवलंबून असून सध्या बांधकामे घटली. पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांकडील उत्पादन घटल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

जागामालकाने जमिनीच्या भाड्यात केलेली वाढ, मजुरी, माती, पिशव्या, बियाणे, रोपे व खताच्या किमती वाढल्याने सध्या हा व्यवसाय केवळ खर्च भागवण्यापुरताच होत आहे. भाडेतत्वावर जमिनी घेऊन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आपला व्यवसाय अन्यत्र हलविण्याची वेळ आली आहे.
- दीपक सोनवणे, औषधी नर्सरी व्यावसायिक, परंदवडी

PNE24U23480

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com