वाहन योग्यता प्रमाणपत्र नाही ? मग, दंड भरा !

वाहन योग्यता प्रमाणपत्र नाही ? मग, दंड भरा !

पिंपरी, ता. २ : वाहन योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या शहरातील वाहनचालकांवर पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे. त्याअंतर्गत आरटीओने १ हजार ८९७ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्यामधून २८ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. चार महिन्यांत ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्‍य शासनाच्‍या आदेशानुसार वेळेत वाहन योग्यता प्रमाणपत्र न घेणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जात आहे. संबंधित वाहनधारकांना मुदत संपल्‍यानंतर प्रत्‍येक दिवसाला ५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. या निर्णयाला वाहन चालक-मालक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. परंतु, सध्या तरी या कारवाईला गती आली असल्‍याचे चित्र आहे. अपघातात नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी बेकायदेशीर आणि फिटनेस नसलेल्‍या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाकडून कारवाई केली जात आहे.
वाहनांच्या कागदपत्रांची आणि वाहनांची तपासणी या पथकाकडून केली जात आहे. या वेळी दोषी सापडलेल्या चालकांकडून दंड आकारला जात आहे. दंड आणि प्रमाणपत्राच्या रक्कमेसोबतच प्रमाणपत्राची तारीख संपल्यावर प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारणी केली जात आहे. त्यामुळे, वाहनचालकांना मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये १ हजार ८९७ वाहनांवर कारवाई केली आहे. त्‍यांच्‍याकडून २८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दंडाची रक्‍कम ही योग्यता प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या रक्‍कमेपेक्षा सहा ते सात पटीने मोठी आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी हे प्रमाणपत्र त्वरित काढावे. अन्यथा वायुवेग पथकाच्या कारवाईस सामोर जावे लागेल.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com