मावळचा निकाल दुपारी तीनपर्यंत

मावळचा निकाल दुपारी तीनपर्यंत

पिंपरी, ता. ३ ः मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, यंत्रणाही सज्ज आहे. सकाळी आठपासून मतमोजणी सुरूवात होणार आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे. त्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मतमोजणीपूर्वी मतदान यंत्र ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. त्यानंतर प्रथम टपाली मतदान मोजले जाईल.

विभागीय आयुक्तांची भेट
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मावळ लोकसभा मतमोजणी केंद्रास सोमवारी भेट देऊन पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मतमोजणीची तयारी व व्यवस्थेबद्दलची माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपआयुक्त वर्षा उंटवाल उपस्थित होत्या. मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापसांत समन्वय ठेऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असा आदेश डॉ. पुलकुंडवार यांनी दिला.

मतमोजणी निरीक्षकपदी हारूण
मावळ लोकसभा मतदारसंघ मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून मोहम्मद हारूण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता पुण्यातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहातील कक्ष क्रमांक २०१ आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४१९०९०६४४ असून त्यांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१२७९५६६ आहे.

मनुष्यबळाची सरमिसळ
मतमोजणीसाठी नियुक्त मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण आणि निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ३) झाली. यामध्ये सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक यांचा समावेश होता. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये अर्थात मतमोजणी केंद्रात झालेल्या मनुष्यबळ सरमिसळ प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, मतमोजणी निरीक्षकांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी आनंद कटके, निवडणूक सहायक अभिजित जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, अर्चना यादव, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आदी उपस्थित होते.

मतमोजणीबाबत...
- एकूण दोन हजार ५६६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया
- पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबल
- पनवेल व चिंचवडची मतमोजणी प्रत्येकी २३ तर; कर्जत, उरण, मावळ व पिंपरीची मतमोजणी प्रत्येकी २५ फेऱ्यांत पूर्ण होणार
- टपाली मतमोजणीसाठी पाच टेबल
- मतमोजणीसाठी विधानसभानिहाय एक हजार ५३० अधिकारी-कर्मचारी नियुक्त
- उमेदवार, मतमोजणी व निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकृत माध्यम प्रतिनिधींना क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश
- अधिकारी-कर्मचाऱ्यांना राजवाडा प्रवेशद्वाराने प्रवेश करतील
- कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात

- परिसरात जमावबंदी आदेश लागू
- १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधित असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com