‘वायसीएम रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा’

‘वायसीएम रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा’

पिंपरी, ता. ४ ः यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा परिणाम रुग्ण सेवेवर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाच्यावतीने कठोर उपाययोजना त्वरित अमलात आणावी. असे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत राहत आहे. ही बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रतिमेस काळिमा लावणारी आहे. आपत्कालीन विभागामध्ये बेडची संख्या अपुरी असल्याने रुग्ण दाखल करून न घेता पुण्यातील ससून रुग्णालयाकडे पाठवले जातात. शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. रुग्णांना व्हील चेअर, स्ट्रेचर उपलब्ध होत नाहीत. शिकाऊ डॉक्टर काम पाहत असून वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा अनेक तक्रारी त्यांनी या निवेदनात केलेल्या आहेत.
या रुग्णालयात रुग्णसेवेच्या धोरणांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. रुग्णसेवेसाठी लागणारी उपकरणे देखील बंद स्थितीत आहेत. लहान व नवजात बालकांसाठी एनआयसीयू देखील उपलब्ध होत नाही. प्रसूती विभागाची क्षमता तीस खाटांची असताना आता फक्त पंधरा खाटा शिल्लक आहेत. रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ खासगी प्रॅक्टिस करत असल्याने रुग्णालयात फक्त एक तास ओपीडी सुरू असते. या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे इन्प्लांट हे डॉक्टरांच्या मर्जीतील व्यक्तींकडून घेण्याची शिफारस केली जाते. असे अनेक आरोप संदीप वाघेरे यांनी केले आहेत. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com