शिवराज्याभिषेक सोहळ्यात 
मोठ्या संख्येने सहभागी व्हा
शिवभक्तांना संभाजी ब्रिगेडचे आवाहन

शिवराज्याभिषेक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा शिवभक्तांना संभाजी ब्रिगेडचे आवाहन

पिंपरी,ता. ३ ः शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा या सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास पिंपरी चिंचवड शहरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
रायगडावरील नगारखान्यासमोर पहाटे भगवा ध्वज उभारून राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याची सुरवात होईल. संभाजीराजे यांच्या हस्ते मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे. रणवाद्य हलगी, घुमक यांच्या कडकडाटात होळीच्या माळावर होणारी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, भव्य पालखी सोहळा, छत्रचामरासह शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा, पारंपारिक वेशभूषेतील शिवभक्त महिला व पुरुषांची ढोल- ताशा पथके, रणवाद्य पथक हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com