‘बिजी स्पेसेस’च्या साईटवरील
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

‘बिजी स्पेसेस’च्या साईटवरील इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

पिंपरी, ता. ४ : रावेतमधील शिंदे वस्ती येथील बिजी स्पेसेस बांधकाम साईटवरील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मजुराचा नुकताच मृत्यू झाला. याबाबत काल रविवारी (ता. २) रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मदन प्रद्युम्न चौहान (वय २८, रा. बीजी स्पेसेस लेबर कॅम्प, गणेशनगर, शिंदे वस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अशोक केदार चौहान यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर मनोज गणेश पवार (वय २८, रा. रामनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे वस्ती येथे बीजी स्पेसपची बांधकाम साइट सुरू असून याठिकाणी मदन हे मजुरीचे काम करायचे. दरम्यान, आरोपीने मजुरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवली नाहीत. हेल्मेट, बेल्ट, सुरक्षा जाळी न पुरविता निष्काळजीपणा केला. दरम्यान, मदन हे बीजी स्पेसेस येथे काम करीत असताना आठव्या मजल्यावरून ४ मे २०२२ रोजी खाली पडले. यामध्ये त्यांच्या तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com