शिवसेना शहरप्रमूख प्रतिक्रिया

शिवसेना शहरप्रमूख प्रतिक्रिया

शिवसेना शहरप्रमुखांच्या प्रतिक्रिया -
-------------------------
मावळ लोकसभेत जनतेने दिलेला कौल मान्‍य आहे. मात्र, तो मान्‍य करताना या मतदारसंघात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात धनशक्‍तीचा वापर करण्यात आला. तसेच प्रशासकीय यंत्रणांचा चुकीचा वापर करण्यात आला. त्‍यामुळे विरोधकांचा विजय झाला. मात्र पुढील काळात जोमाने काम करून, पक्षवाढीसाठी प्रयत्‍न करू. तसेच मावळ लोकसभेतील जनतेने संजोग वाघेरे यांना मतांच्‍या रूपात दिलेल्‍या आशिर्वादाबाबत मतदारांचे मनःपूर्वक धन्‍यवाद.
- ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पिंपरी चिंचवड
.....
‘‘खासदार श्रीरंग बारणे यांनी यापूर्वी केलेल्‍या मतांचा हा विजय आहे. या पुढील काळात शासनाच्‍या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्यात येतील. त्‍याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्‍न केला जाणार आहे.
- नीलेश तरस, शहरप्रमुख, शिवसेना पिंपरी चिंचवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com