सकाळ एक्स्पो प्रदर्शन

सकाळ एक्स्पो प्रदर्शन

पिंपरी, ता.४ : दहावी-बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेताना करिअरची नेमकी दिशा ठरविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ’च्यावतीने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन काळेवाडी - संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलाजवळील रागा पॅलेस येथे शनिवारी (ता.८) सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाच्यानिमित्ताने विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे.
या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील ३० हून अधिक नामांकित शिक्षण संस्था सहभागी झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ चे मॅट्रिस सायन्स ॲकॅडमी हे प्रायोजक आहेत. तर एमआयटी आळंदी कॅम्पस हे सहप्रायोजक आहेत. अकरावी-बारावीसह पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम तसेच विविध कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेस‌ची माहिती येथे मिळणार आहे. दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना आणि करिअरची दिशा ठरविताना नेमके काय करावे ? कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि करियरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. याबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येणार आहे. प्रदर्शनानिमित्त आयोजित चर्चासत्रांत विद्यार्थी-पालकांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. याशिवाय करिअरविषयक समुपदेशनही मिळू शकणार आहे.

अनेक विषयांवर चर्चासत्रे
विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे पर्याय आणि त्यावर आधारित मार्गदर्शनपर चर्चासत्रे येथे आयोजित केली जाणार आहेत. एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), एव्हिएशन, आर्चिटेक्चरमधील करिअर, उच्चशिक्षण करण्यासाठी अभ्यासक्रम आणि महाविद्यालय कसे निवडावे, इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि शाखा कशी निवडावी ? डिझाईनमधील करिअर, सर्वोत्तम करिअर निवडताना पालकांची भूमिका अशा विविध शैक्षणिक विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.


काय?, केव्हा?, कधी?, कुठे?
काय? ः सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४
कधी? ः शनिवार ता. ८ आणि रविवार ता. ९ जून
केव्हा?ः सकाळी ११ ते रात्री ८
कुठे? ः रागा पॅलेस, संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलाजवळ, काळेवाडी

अधिक माहितीसाठी
- अमोल ८३७८९८७८३६ आणि सचिन ९७३०९५९६९९


सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो या उपक्रमात आम्ही कायमच सहभागी होत असतो. या एक्स्पोमधून अभ्यासक्रम निवडताना, करिअरची दिशा ठरविताना मदत मिळते. एकाच छताखाली माहिती मिळते. या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम करिअर निवडण्यासाठी मदत मिळणार आहे.
- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इंडस्ट्रीजची मागणी समजून प्राध्यापक वर्ग आवश्‍यक मेहनत घेत आहे. दहावी-बारावीनंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी पालकांना सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोमधून माहिती मिळणार आहे. यातून पालकांना मदत मिळणार आहे.
- डॉ. सायली गनकर, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, आंबी


औद्योगिक क्षेत्रात ऑटोमेशन रोबोटिक्स, मेट्रोनिक्स, एआय इत्यादी कौशल्यांची गरज वाढती आहे. त्यासाठी उपलब्ध असणारे शिक्षणाचे पर्याय याची पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती मिळू शकेल. विशेषतः पुण्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री हब याचा चांगले करिअर होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. इंडस्ट्रीजची मागणी काय आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.’’
- गीता जोशी, प्राचार्या, मराठवाडा मित्र मंडळ, पॉलिटेक्निक कॉलेज

विद्या एक्स्पो लोगो : PNE24U23905

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com