भारतरत्न पंडित भीमसेन जोशी महोत्सव उद्यापासून सुरू

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी महोत्सव उद्यापासून सुरू

पिंपरी,ता. ५ ः शास्त्रीय गायन, नृत्य, जुगलबंदी अशा कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवाला येत्या शुक्रवार (ता.७) पासून सुरूवात होत आहे. रविवार (ता.९) पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. विदुषी देवकी पंडित, कथ्थक नर्तक पं.दीपक महाराज, गायक पं.श्रीनिवास जोशी आदी प्रख्यात आणि दिग्गज कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारा संचलित संगीत अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून डॉ. भरत बलवल्ली यांच्या गायनाने महोत्सवाला सुरूवात होईल. या तीन दिवसीय महोत्सवाचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील ः
शुक्रवार ः ७ जून ः सायं ५.३० ते १०
- कार्यक्रमाचे उदघाटन, दीपप्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत
- डॉ. भरत बलवल्ली यांचे शास्त्रीय गायन
- डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांचे शास्त्रीय गायन

शनिवार ः ८ जून ः सायं ५.३० ते १०
- संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
- पं. सुधारक चव्हाण यांचे शास्त्रीय गायन
- उ. शाकीर खान, तेजस उपाध्ये यांची सतार, व्हायोलिन जुगलबंदी
- पं. श्रीनिवास जोशी व श्री. विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन
- पं. दीपक महाराज यांचे कथ्थक नृत्य

रविवार ः ९ जून ः सायं ५.३० ते १०
- नंदीन सरीन यांचे शास्त्रीय गायन
- कृष्णा बोगांणे, अंकिता जोशी जसरंगी सहगायन
- विदुषी देवकी पंडित याचे शास्त्रीय गायन
- पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com