चिंचवड येथे तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

चिंचवड येथे तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पिंपरी, ता. ६ : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना चिंचवड, अजंठानगर येथील टीसीआय कंपनीजवळ घडली. अंकुश श्यामराव कुऱ्हाडकर (रा. शिवनगरी, गाथा मंदिराच्यामागे, देहू) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी सोनवणे, संतोष सोनवणे (दोघेही रा. टीसीआय कंपनीजवळ, पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हा त्याचा मित्र मोन्या याच्यासह त्याच्या आजीकडे जात असताना फिर्यादींसोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना थांबवले. ‘तू आमच्या भावाला मारले होते, तुला संपवतोच’ असे म्हणत आरोपी संतोष याने फिर्यादीला धरून सनी याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने तीनवेळा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीचा मित्र मोन्या भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याच्यावरही कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com