धोकादायक पूल अन् इमारतींचा 
आयुक्तांनी मागविला अहवाल

धोकादायक पूल अन् इमारतींचा आयुक्तांनी मागविला अहवाल

पिंपरी, ता. ६ ः पावसाळ्यापूर्वीच्या तयारी अंतर्गत पूल आणि मोठ्या इमारतींची तपासणी केली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्व तयारी केली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील पूल व मोठ्या इमारतींची तपासणी केली जाणार आहे. पूल व इमारती धोकादायक आहेत का? त्यांच्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत का? ती काढून टाकले आहेत की नाही? पुलांवरील पाणी वाहून जाण्यासाठी साफसफाई केली आहे किंवा नाही? याबाबतचा अहवाल सात दिवसाच्या आत आयुक्त कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावा, असा आदेश आयुक्त सिंह यांनी मुख्य शहर अभियंता, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता, स्थापत्य व प्रकल्प विभागांचे सहशहर अभियंता यांना दिला आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com