मोटरचालक सहायक फौजदार निलंबित

मोटरचालक सहायक फौजदार निलंबित

पिंपरी, ता. ६ : पोलिसांच्या मोटारीने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी मोटार चालक सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यपान केल्याचेही निष्पन्न झाले. मंगळवारी (ता. ४) बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलिस चौकीसमोर हा प्रकार घडला होता.
नागेश भालेराव असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव असून हिंजवडी पोलिस ठाण्यात ते नियुक्तीस होते. या अपघातात शकुंतला पंडित शेळके (रा. म्हाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होती. त्यादिवशी भालेराव हे संकुलाजवळील पोलिस चौकीसमोर गेले. तेव्हा, भालेराव यांचा पाय वेग वाढवण्याच्या अ‍ॅक्सिलेटरवर पडला. त्यामुळे, पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह दुचाकीला मोटारीने धडक दिली. त्यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच एका तरुणाच्या दुचाकीचे नुकसान झाले. वैद्यकीय तपासणी केली असता भालेराव यांनी मद्यपान केल्याचे उघड झाले. भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.


या अपघातप्रकरणी भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी मद्यपान केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांनी वाहन चालविताना निष्काळजीपणा केला. तसेच नेमणूक नसतानाही त्याठिकाणी गेले. त्यामुळे, भालेराव यांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी देखील होणार आहे.
- कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे

नेमणूक नसतानाही तेथे हजर
जेथे अपघात घडला. त्याठिकाणी अथवा परिसरात कुठेही बंदोबस्तासाठी भालेराव यांची नेमणूक झालेली नव्हती. तरीही ते वरिष्ठांच्या परवानगीविना तेथे गेले आणि हा अपघात घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com