शिवलिंग व्यवहारेचे शतक, विराजही चमकला

शिवलिंग व्यवहारेचे शतक, विराजही चमकला

Published on

पिंपरी, ता.४ ः व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेत ‘ट्रिनिटी’, ‘अष्टपैलू झोराष्ट्रीयन’ संघांनी गुरुवारी साखळी फेरीत विजय मिळविले. ‘ट्रिनिटी’च्या शिवलिंग व्यवहारे याने सुरेख शतक झळकाविले. तर दुसऱ्या सामन्यात ‘अष्टपैलू झोराष्ट्रीयन’च्या विराज यादव याने नाबाद ६८ धावा फटकाविल्या.
पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीतर्फे, १६ वर्षांखालील मुलांसाठी ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात ‘ट्रिनिटी’ने ‘चंद्रोस’चा ६ गडी राखून विजय मिळविला. विजयी संघाचे सलामीवीर शिवलिंग व्यवहारे (११० धावा) आणि प्रेम इघे (९४) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. तर जिवक गोठणेकर याने भेदक मारा करत पुन्‍हा पाच बळी टिपले. ‘चंद्रोस’च्या प्रेम मुंगेल (९३ धावा), दीप पाटील (९३ धावा) यांनीही सुरेख खेळ केला. शिवलिंग हा सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात ‘अष्टपैलू झोराष्ट्रीयन’ने पूना क्लबला ९ गडी राखून पराभवाचा धक्का दिला. विजयी संघाचा सलामीवीर विराज यादव सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक -
चंद्रोस ः ४३.३ षटकांत सर्वबाद २३८ - वेद मुंगेल ९३, दीप पाटील ९३ (जिवक गोठणेकर ५/४६, हर्ष पाटील २/८) पराभूत वि. ट्रिनिटी ः ४०.५ षटकांत ४ बाद २४२ - शिवलिंग व्यवहारे ११०, प्रेम इघे ९४ (दीप पाटील २/४३);
पूना क्लब ः ३८ षटकांत सर्वबाद १२२ - आदित्य कारळे ३२ (आयुष पंडित २/१६) पराभूत वि. अष्टपैलू झोराष्ट्रीयन ः २७.२ षटकांत १ बाद १२५ - विराज यादव नाबाद ६८, जय आगरवाल ३९.
PNE24U11785, PNE24U11787, PNE24U11789

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com