एआय तंत्रज्ञान हे नोकरी देणारे, हिरावणारे नाही

एआय तंत्रज्ञान हे नोकरी देणारे, हिरावणारे नाही

पिंपरी,ता. ८ ः ‘‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हे नोकरी देणारे क्षेत्र आहे. नोकरी हिरावून घेणारे क्षेत्र नक्कीच नाही. भारतासारख्या देशात अनेक क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्समध्ये अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.’’, असे मत पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थोपटे यांनी व्यक्त केले.
काळेवाडीतील रागा पॅलेस येथे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनानिमित्त ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील करिअरच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या चर्चासत्राला विद्यार्थी व पालक यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
थोपटे म्हणाले,‘‘एआयमुळे मनुष्यबळाची गरज भासणार नाही, असे होणार नाही; तर आपल्या उत्पादनाची व सेवेची गुणवत्ता नक्कीच वाढेल. भारतासारख्या देशाला एआयचा फायदाच होणार आहे. शिक्षण, बॅंकीग, वैद्यकीय, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत एआयचा उपयोग होणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून आपल्या उत्पादनांची मागणी कुठे व किती आहे ? याबाबतची इत्यंभूत माहिती घेणे, त्यानुसार पुरवठ्यात एआयची मदत घेतली जात आहे. त्याचा फायदा ग्राहकांनाही होत आहे. या गोष्टी सरकारी योजनांसाठीही लागू पडू शकतात. विमा कंपन्यांमध्ये किती आर्थिक गुंतवणूक करावी व त्याचा परतावा काय असेल ? याचे नियोजन एआयव्दारे करता येऊ शकते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com