रस्त्यालगतच्या विक्रेत्यांमुळे 
सोमाटण्यात वाहतुकीला अडथळा

रस्त्यालगतच्या विक्रेत्यांमुळे सोमाटण्यात वाहतुकीला अडथळा

Published on

सोमाटणे, ता. ३० ः सोमाटणे चौकातील रस्त्यालगतच्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे चौकातील महामार्गासह परंदवडी-सोमाटणे, शिरगाव-सोमाटणे या रस्त्यालगत अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. या परिसरात कोठेही वाहन थांबा नसल्याने सर्वच ग्राहक पुणे-मुंबई महामार्ग, सोमाटणे-परंदवडी रस्ता, शिरगाव-सोमाटणे रस्त्यावर वाहने उभी करतात. या वाहनचालकांमुळे इतर वाहनांना जाण्यासाठी जागा अपुरी राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढते. येथे पोलिस मदत केंद्र आहे. परंतु त्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत वाहनचालकांची मनमानी वाढली असल्याने ते कोठेही
वाहने उभी करतात. या वाहनचालकांच्या मनमानीला चाप बसण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

PNE24U16800

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com