प्राचीन मंदिरांमुळेच देशाच्या इतिहासाचे आकलन ः बंकापुरे

प्राचीन मंदिरांमुळेच देशाच्या इतिहासाचे आकलन ः बंकापुरे

पिंपरी, ता.३० : ‘‘चंद्र, सूर्य यांचा अभ्यास करून विज्ञान आणि गणित यांची सांगड घालून आपली प्राचीन मंदिरे बांधण्यात आली असून त्यांच्यामुळेच देशाचा इतिहास आणि संस्कृतीचे आकलन होते.’’, असे मत व्याख्याते इंद्रनील बंकापुरे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागातर्फे आयोजित चैत्रगौरी कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘मंदिरांच्या देशा’ या विषयावरील व्याख्यानात बंकापुरे हे बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, अश्विनी अनंतपुरे, शीतल गोखले, प्रदीप पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बंकापुरे म्हणाले,‘‘स्थापत्य आणि पौराणिकत्व यातून मंदिरे साकारली जातात. मंदिरे बांधण्यात स्थपतिंचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘स्थपतेः कर्म स्थापत्यम्’ असे म्हटले जाते. शास्त्र, कर्म, प्राज्ञ, शील हे गुण स्थपतिंमध्ये असतील; तर ते आपल्या बुद्धीच्या जोरावर अद्‍भुत मंदिरांची रचना करू शकतात. मंदरे स्वतःला स्वतःची ओळख करून देतात तसेच त्यांच्यामध्ये ब्रहमांडाचे रूप दिसते.’’
खजुराहो मंदिर, राणी की बाव, वेरूळ लेणी, ओडिसामधील परशुरामेश्वर मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा अनेक मंदिरांचा इतिहास तसेच हिंदू धर्मातील १८ पुराणे, १०८ संख्या आणि प्रत्येक ठिकाणच्या शिल्पांचे महत्त्व यासंदर्भात देखील बंकापुरे यांनी विस्तृत माहिती दिली.
संपदा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविक केले. अनघा कानडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उज्ज्वला जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com