‘व्हेरॉक चषका’साठी आज लढत रंगणार

‘व्हेरॉक चषका’साठी आज लढत रंगणार

पिंपरी, ता.२ ः पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीतर्फे, १२ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित ‘व्हेरॉक चषक’ क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘आर्यन्स’ विरुद्ध ‘स्पार्क’ तसेच यजमान ‘अ’ विरुद्ध ‘ब’ संघांत उपांत्य सामने होणार आहेत. उद्या शुक्रवारी (ता.३) स्पर्धेचा अंतिम सामना होईल.
अकादमीच्या थेरगाव येथील मैदानावर बुधवारी चार साखळी सामने झाले. पहिल्या सामन्यात
व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ संघाने गॅरी कर्स्टन अकादमीवर ९ गडी राखून विजय मिळविला.
श्रेयस राठोड सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात ‘यंगस्टर’ने ‘स्पोर्टिव्ह’ संघावर ८३ धावांनी दणदणीत विजय मिळविला. गोलंदाज अद्वय देशमुख सामन्याचा मानकरी ठरला.
तिसऱ्या सामन्यात ‘एच.के.बाऊन्स’वर विराग अकादमीने ८ गडी राखून मात केली. गोलंदाज विहान सुतार (५ बळी) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सामनावीराचा बहुमान प्रदान करण्यात आला. अखेरच्या साखळी सामन्यात व्हेरॉक-वेंगसरकर ‘ब’ संघाने ‘रायझिंग स्टार’ संघाला अवघ्या तीन धावांनी पराभूत केले. गोलंदाज अद्विक मगर याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः गॅरी कर्स्टन ः २१.२ षटकांत सर्वबाद ४२ - आर्यश सिंग १७ (श्रेयस राठोड ३/२, पलक व्यास २/९, सुधाकर राठोड २/७) पराभूत वि. व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ ः ७.१ षटकांत १ बाद ४३ - श्रेयस राठोड नाबाद १४;
- यंगस्टर ः २५ षटकांत ७ बाद १८६ - स्वयम कांबळे ५८, द्विजेश ढवळे नाबाद ५४ (अद्वय सामंत २/१७) वि.वि.स्पोर्टिव्ह ः २४.१ षटकांत सर्वबाद १०३ (अद्वय देशमुख ३/१८, विकी २/९);
- एच.के.बाऊन्स ः १९.३ षटकांत सर्वबाद ७० - ऋषिकेश देशमुख २५ (विहान सुतार ५/२, शाश्वत सिंग ३/३) पराभूत वि. विराग ः १२.३ षटकांत २ बाद ७१ - कुमार पंडागळे नाबाद २७;

PNE24U17079, PNE24U17085, PNE24U17075, PNE24U17087

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com