मतदान साहित्य वितरण प्रक्रियेची अधिकाऱ्यांकडून पिंपरीत पाहणी

मतदान साहित्य वितरण प्रक्रियेची अधिकाऱ्यांकडून पिंपरीत पाहणी

पिंपरी, ता. २ ः मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयाकडून मतदान अधिकाऱ्यांना एक दिवस आधी मतदान यंत्र व निवडणूक साहित्य वितरण केले जाईल. मतदानानंतर यंत्र स्वीकृती केली जाईल. मतदान यंत्र वाटप व स्विकृतीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र क्रमांक एक व दोन येथे नियोजन केले आहे.
मतदान यंत्र वाटप व स्विकृती प्रक्रियेची पाहणी निवडणूक निरीक्षक बुदिथी राजशेखर यांनी केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी नियोजनाची माहिती दिली. पिंपरी विधानसभा मतदासंघामध्ये ५२ सेक्टर ऑफिसर नियुक्त केले असून ८५ इमारतींमध्ये ४०० मतदान केंद्रे असतील. मतदानाच्या एक दिवस अगोदर केंद्र प्रमुख व केंद्र अधिकारी- कर्मचारी केंद्राची रचना व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण घेऊन साहित्य वितरण केले जाईल. मतदान अधिकारी - कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ७३ बसची सोय केली आहे. तसेच अग्निशामक दलाचे वाहन, रुग्णवाहिका, पाण्याचा टँकर उपलब्ध असेल. अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी वाहनतळाची सोय होणार आहे. निवडणूक निरीक्षकांचे समन्वयक प्रमोद ओंभासे, सुनील भागवाणी, साहित्य वितरण व स्वीकृती कक्षाचे नोडल ऑफिसर सुनील पवार, गिरीश गुठे, भांडार विभागाचे नोडल अधिकारी तुषार पडवळ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com