नफ्याचे आमिष दाखवून
 ८९ लाखांची फसवणूक

नफ्याचे आमिष दाखवून ८९ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. ८ : गुंतवणुकीवर जास्त नफ्याचे आमिष दाखवून, ज्येष्ठ नागरिकाची ८९ लाखांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी पिंपरीतील ६२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या व्हाट्सअप तसेच टेलिग्रामवर मेसेज पाठवून वेगवेगळ्या टेलिग्राम लिंकमध्ये जॉईन होण्यास सांगितले. फिर्यादीला एका संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या उत्पादनावर क्लिक करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवून नफा मिळविण्याचे टास्क दिले. त्यानंतर वेगवेगळी कारणे देत वेगवेगळ्या बँक खात्यात तसेच यूपीआय आयडीवर रक्कम भरण्यास सांगून ती रक्कम व त्यावरील नफा फिर्यादीला परत न देता त्यांची ८९ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com