पवनमावळात पावसाचा जोर कायमच
सोमाटणे, ता. २७ ः पवनमावळात पावसाचा जोर आज वाढल्याने पवना, आढले, कासारसाई नदीची पूरस्थिती पाचव्या दिवशीही कायमच आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी संततधार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून, दिवसभरात कासारसाई, आढले धरण परिसरात ४५ मिमी तर एकूण ११०० मिमी पाऊस पडला आहे. पवना, मळवंडी धरण परिसरात दिवसभरात ११२ मिमी तर एकूण ४९५० मिमी पाऊस पडला आहे. या संततधार पावसामुळे भात शेतातील अतिरिक्त पाणी व डोंगरउतारावरील पाणी वाहत असल्याने आढले, मळवंडी, पुसाणे ही तीनही अगोदरच ओव्हरफ्लो झालेल्या धरणातील पाणी सांडव्यावाटे वेगाने वाहत असल्याने आढले, कासारसाई या दोन्ही नद्यांची पाणीपातळी कायम आहे. आढले धरणातील विसर्गाने चांदखेड, दारुंब्रे पुलाजवळ नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. कासारसाई नदी सांगवडेजवळ धोक्याच्या पातळीत वाहत असून मळवंडी, पवना धरणातील विसर्गामुळे आज पाचव्या दिवशीही साळुंब्रे पूल पाण्याखाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने कासारसाई नदी पात्रात कोणीही उतरू नये, सुरक्षा बाळगावी, असे आवाहन शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

