मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देवांग, कसगावडे यांच्यासह दहा जणांना जाहीर
पिंपरी, ता.२७ ः अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गोपाळ देवांग, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्यासह दहा मान्यवरांना खडकी येथे गुरुवारी (ता. २९) मेजर ध्यानचंद जीवन गौरव २०२४ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव श्रीधरन तंबा यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. मेजर ध्यानचंद यांचा जयंतीनिमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. औंध रस्त्यावरील पुणे रेल्वे पोलिस मुख्यालयात सायंकाळी चार वाजता वरील कार्यक्रम होणार आहे.
पुणे रेल्वे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, प्राचार्या शर्मिला कदम यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या समारंभास माजी राष्ट्रीय हॉकीपटू स्टॅन्ले डिसूझा, देवदास मार्टिन, गिल्बर्ट पिंटो, अजय परदेशी चिन्मय कोराड, माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू लीला वालिया, सीमा विश्वकर्मा, एफसीआयचे व्यवस्थापक व्हिक्टर ॲँथोनी हे उपस्थित राहणार आहेत.
अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय हॉकीपटू रमेश पिल्ले, माजी आंतरराष्ट्रीय ॲथलिट मेर्लिन जोसेफ, मानद व्याख्याते डॉ. मिलिंद ढमढेरे, माजी आंतरराष्ट्रीय हॉकी पंच सतिंदर सिंग वालिया, माजी राष्ट्रीय हॉकीपटू आनंद साळवी, ज्येष्ठ फुटबॉलपटू व संघटक संदेश बोर्डे आदींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

