फुगेवाडी प्राथमिक शाळेचा ‘तिसरा डोळा’ बंद

फुगेवाडी प्राथमिक शाळेचा ‘तिसरा डोळा’ बंद

Published on

पिंपरी, ता. २७ ः फुगेवाडी शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंतीवरील सीसीटिव्ही कॅमेरे काढून ठेवण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरापासून प्राथमिक व माध्यमिक शाळेत पुन्हा सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. याबाबत पालकांनी वारंवार तक्रारही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
पालकांनी ‘सारथी’वर अनेकवेळा तक्रार केली. परंतु, हा कॅमेरा आमच्यामार्फत लावला नाही ? तो कोणी बसविला आहे हे माहित नाही? हे आमचे काम नाही? अशी टोलवाटोलवीची उत्तरे स्मार्ट सिटी आणि महापालिका विभाग देत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.

मुख्याध्यापक खोलीतील डिस्प्ले बंद
महापालिका शाळेतील मुख्याध्यापक यांच्या खोलीत बसविलेला डिस्प्ले बंद आहे. पालकांनी ही बाब शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या लक्षात आणून दिली आहे. हा डिस्प्ले बंद असल्याने कुठे आणि काय घडत आहे ? याची माहिती मिळण्यास अडचण येत आहे. जर शाळेचे कॅमेरे बंद असतील; तर मुलींच्या सुरक्षेचे काय ? यावर पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

भुयारी मार्गात मुलींची छेडछाड ?
फुगेवाडीतील भुयारी मार्गातून महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना ये- जा करावी लागते. त्या भुयारी मार्गात मुलींची छेडछाड केल्याची प्रकरणे घडत आहेत. तेथे टवाळखोर मुले येऊन थांबतात. त्यामुळे, मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज केले आहेत. तरी संबंधित विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन सीसीटीव्ही कॅमेरा बसवून विद्यार्थी कसे सुरक्षित राहतील ? याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पालक करत आहेत.

‘‘मी अनेकवेळा महापालिकेत आणि जनसंवाद सभेत शाळेतील सीसीटिव्ही बंद असल्याची तक्रार मांडली असता अनेक अधिकारी हे आमच्या विभागाशी संबंधित नाही, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. आमच्या मुली या शाळेलगतच्या भुयारी मार्गातून येता-जाता सुरक्षित नाहीत. आम्हाला भीती वाटते.
- यलाप्पा वालदोर, पालक, दापोडी

‘‘फुगेवाडी शाळेत सीसीटीव्ही सुरू नसल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षित असल्याची भावना वाढली आहे. वारंवार तक्रार करून स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ अधिकारी काम न करता एकमेकांवर ते ढकलत आहेत.’’
- अनिल जाधव, पालक फुगेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com