शालेय जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेमध्ये ‘एस.बी.पाटील’, ‘विद्यानिकेतन’चे विजय

शालेय जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेमध्ये ‘एस.बी.पाटील’, ‘विद्यानिकेतन’चे विजय

Published on

पिंपरी, ता. २७ ः शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या ‘ड’ गटात एस.बी.पाटील, टाटा मोटर्स विद्यानिकेतन, युरो स्कूल, विस्डम स्कूल आदींनी मंगळवारी पहिल्या फेरीत विजय मिळविले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे, पिंपरी येथील डॉ.हेडगेवार क्रीडा संकुलाच्या मैदानावर वरील स्पर्धा झाली. स्पर्धा प्रमुख व क्रीडा पर्यवेक्षक बाळाराम शिंदे यांनी संयोजन केले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एस.बी.पाटील स्कूलने अश्विनी इंटरनॅशनल स्कूलवर २-० असा विजय मिळविला. सत्यम शर्मा, कुणाल कारंडे यांनी प्रत्येकी एकेक गोल नोंदविले. दुसऱ्या सामन्यात टाटा मोटर्स विद्यानिकेतन स्कूलने अद्राईत पवार याच्या एकमेव गोलाच्या जोरावर गोदावरी हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाला १-० असे पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात युरो स्कूलने शिवछत्रपती शिवाजीराजे हायस्कूलचा २-१ असा पराभव केला. विजयी संघाकडून आयुष मिश्रा, राजवीर शिंगोटिया यांनी एकेक तर पराभूत संघाकडून सारंग पाटील याने एक गोल केला.
इतर निकाल पुढील प्रमाणे -
विस्डम स्कूल (अद्वेक सिन्हा, विहान भानवत) २ वि.वि. स्टर्लिंग ०; एस.एस.अजमेरा (फरहान शेख) १ वि.वि. मार इव्हानिअस ०; पोदार इंटरनॅशनल (पेनल्टी शूटआउट - ईशान यादव, वेद बिराजे, हर्ष चौधरी, वेदांत रोहकले) ४ वि.वि. मास्टर माइंड ग्लोबल (सोहम, मितांश हातवर, पियुष पाटील) ३; डॉ.डी.वाय.पाटील ( पेनल्टी शूटआउट - शिखर बोरा, कृष्णा नगरे, निर्वाण चुग) ३ वि.वि. साधू वासवानी इंटरनॅशनल (अद्वैत साळुंखे, अभिराज गौतम) २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com