‘बारावीनंतरच्या करिअर’वर एक सप्टेंबरला चर्चासत्र

‘बारावीनंतरच्या करिअर’वर एक सप्टेंबरला चर्चासत्र

Published on

पिंपरी, ता.२७ ः रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘सकाळ विद्या’ व पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च यांच्यावतीने रविवारी (ता. १) ‘बारावीनंतरचे करिअर’ या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला या चर्चासत्राला सुरुवात होईल.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेबरोबरच विविध सीईटी परीक्षांना कसे सामोरे जायचे ?, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बीबीए, बीसीए, बी.कॉम व बीए या कोर्सेससाठी आता सीईटी द्यावी लागत आहे. या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या बदलांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘प्लेसमेंटच्या संधी’ यावर डॉ. शीतलकुमार रवंदळे, विवेक वेलणकर, पीसीसीईओई ॲण्ड रिसर्चचे प्राचार्य व वैज्ञानिक डॉ. हरीश तिवारी आणि ‘बारावीनंतरचे करिअर’ या विषयावर बीबीए, बीसीएच्या विभाग प्रमुख डॉ. स्मृती पाठक बोलणार आहेत.

बीबीए, बीसीएमधील प्रवेश
या चर्चासत्रात बीबीए, बीसीएमधील शिक्षण आणि प्रवेश; राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी ? पदविका परीक्षांसाठी होणारी ‘सीईटी’ या परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल यावर चर्चासत्रात तज्ज्ञ वक्ते बोलणार आहेत. व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. मात्र, बऱ्याच उमेदवारांना ही परीक्षा देता न आल्याने पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. याबरोबरच बी.कॉम आणि बी.ए यावर मार्गदर्शन होणार आहे.

आता सीईटी बंधनकारक
आतापर्यंत बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होत होती. मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम स्वतःच्या अखत्यारित घेऊन, या अभ्यासक्रमांसाठी मान्यता बंधनकारक केली. त्यानंतर, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सीईटी सेलतर्फे २९ मे यंदा सीईटी घेण्यात आली. मात्र, उपलब्ध जागांच्या तुलनेत सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती. त्यामु‌ळे, राज्यभरातील महाविद्यालयांतील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करून संस्थाचालकांनी पुन्हा सीईटी घेण्याची मागणी केली होती. ‘सकाळ विद्या’ या चर्चासत्रातून विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.


काय?ः कधी? केव्हा? कुठे?
काय? ः बारावीनंतरचे करिअर
कधी? ः रविवारी १ सप्टेंबर २०२४
केव्हा? ः सकाळी १० वाजता
कुठे? ः एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत
प्रवेश ः विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य
वक्ते ः डॉ. शीतलकुमार रवंदळे, विवेक वेलणकर,डॉ. हरीश तिवारी, डॉ. स्मृती पाठक
नावनोंदणी निश्चित करण्यासाठी संपर्क करा
संपर्क ः९७३०९५९६९९, ९३०७७१५९०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com