पवनमावळात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

पवनमावळात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
Published on

सोमाटणे, ता. ३० ः पवनमावळातील विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून, त्वरित सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा नऊ गावच्या सरपंचांनी दिला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पवनमावळातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या चांदखेडसह कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, आढले (खु), आढले (बु), डोणे या नऊ गावांत विजेचा लपंडाव सुरू असून, केव्हाही वीज येते व जाते. प्रसंगी रात्रभर वीज गायब असते. यामुळे नऊ गावच्या पाणीयोजना अडचणीत आल्या असून, धरण व गावातील विहिरीला मुबलक पाणी असतानाही महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. विजेअभावी सीसीटीव्ही बंद असल्याने गावागावांत चोरीच्या घटना सुरू झाल्या असून, भितीचे वातावरण वाढले आहे. विजेअभावी पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. कासारसाई धरणालगतच्या कृषी पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला असून, व्यावसायिकांनी नियमित वीज बिल भरूनही त्यांना जनरेटरचा वापर करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यातच विजेअभावी रात्रीच्या अंधारामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, वीजवितरण कंपनीने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा ग्रामस्थांसह नऊ गावच्या सरपंचांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मावळच्या तहसीलदारांना व वीजवितरण कंपनीला दिले आहे. या निवेदनावर सुवर्णा घोटकुले (सरपंच, आढले), मीना माळी (सरपंच चांदखेड), दिलीप शिंदे (सरपंच ओवळे), नीता येवले (सरपंच पाचाणे), संगीता केदारी (सरपंच कुसगाव), अमोल वाजे (सरपंच पुसाणे), ऋषिकेश वाजे (सरपंच डोणे), नंदा भालेसाईन (सरपंच आढले), गणेश राजवडे(सरपंच दिवड) आदी सरपंचांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com