पिंपरी : प्रशस्त रस्ते, पाणी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनासारख्या सुविधा; शाळा-महाविद्यालये, बॅंका, विविध कार्यालये, मॉल्स, हॉटेल्स आदी क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत चऱ्होलीने भरारी घेतली आहे. त्यात आता माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटीची भर पडणार आहे. .शिवाय, खराडी- चऱ्होली- तळवडे- हिंजवडी असा आयटी कॉरिडॉर निर्माण होत आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी वाड्यावस्त्यांचे गाव अशी ओळख असलेल्या चऱ्होलीची वाटचाल आता आयटी सीटीकडे होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये लगतची १८ गावे समाविष्ट झाली आहेत. आता या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. शहराच्या उत्तर-पूर्वेकडील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी आणि उत्तर पश्चिमेकडील मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, वाकड, पिंपळे निलख या गावांचा समावेश आहे. .२००९ मध्ये ताथवडे गावाचाही महापालिकेत समावेश झाला आहे. राज्य सरकारच्या नवीन आयटी धोरणानुसार, या समाविष्ट गावांमध्ये नवीन आयटी पार्क विकसित केले जाणार आहे. त्यात चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या गावांचाही समावेश आहे. त्यातील चऱ्होलीतील आयटी पार्कला मुहूर्त मिळाला आहे. त्यासाठी इमारती बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन पंधरा दिवसांपूर्वी झाले आहे. त्यामुळे चऱ्होलीतील आयटी पार्क दृष्टीक्षेपात आले आहे.असे असेल चऱ्होली आयटीपिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली बुद्रूक येथील प्राइड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून तब्बल तीस दशलक्ष चौरस फूट आयटी पार्क विकसित होणार आहे. येथे सुमारे ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे नियोजन केले आहे. ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्शिअल कॉरिडॉर’मध्ये हा पहिला आयटी पार्क विकसित होत आहे..गेल्या वर्षीचा संकल्प मार्गीराज्याच्या नवीन आयटी- २०२३ धोरणाची पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी नवीन आयटी पार्क विकसित करण्याचा ‘संकल्प’ होता. त्याला मुहूर्त मिळाला असून, चऱ्होलीमध्ये आयटी पार्क विकसित होतो आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.