सदनिका हस्तांतरण शुल्क कमी करण्याची मागणी

सदनिका हस्तांतरण शुल्क
कमी करण्याची मागणी
Published on

पिंपरी, ता. ३० : जुनी सदनिका खरेदी केल्यानंतर मालमत्ता करामधील नाव बदलण्यासाठी हस्तांतरण शुल्क कमी करण्याची मागणी गौरी अष्टीकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ही मागणी केली आहे. अष्टेकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही तिघांनी मिळून जुनी सदनिका विकत घेतली होती. यापूर्वी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना ईमेलद्वारे पत्र पाठविले होते. समक्ष भेटून ते पत्र दिले होते. समस्या सांगितली. मालमत्ता करामधील नाव बदलण्यासाठी हस्तांतरण शुल्क कमी करण्याची मागणी केली. परंतु महापालिकेच्‍या परिपत्रकानुसार ते शक्य नसल्‍याचे सांगितले. पुणे महापालिका व पिंपरी- चिंचवड महापालिका या दोन्ही महापालिका मालमत्ता करातील हस्तांतरण शुल्काबद्दल‍या नियमांमध्ये तफावत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना मालमत्तेच्या बाजारभावाच्या ०.५ टक्‍के इतकी भरावी लागते. पूर्वी पिंपरी-चिंचवडकरांना नाममात्र शुल्क होती, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com