

- हर्षदा त्रिभुवन (डीपीयू फार्मसी महाविद्यालय)
गणेश चतुर्थीनिमित्त डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली. शांती आणि सकारात्मक वातावरणात गणेशोत्सव साजरा केला. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक सजावटीतून दर्शविले. महिला सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. या सजावटीने महिलांच्या शक्ती, बुद्धी आणि नेतृत्व क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात महिलांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी ही सजावट सुंदर पद्धतीने करण्यात आली होती. श्री गणेशाच्या आगमनाला ढोल-ताशांचा निनाद केला. विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या समित्यांमध्ये विभागणी केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कॉलेज प्रशासनाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला.
(46565)
--
श्री जैन विद्याप्रसारक मंडळाच्या
वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
- श्रृती गांधी (रसिकलाल एम. धारिवाल कॉलेज ऑफ फार्मसी चिंचवड)
श्री जैन विद्याप्रसारक मंडळाचा ९७ वा वर्धापनदिन रसिकलाल एम. धारिवाल कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सचिन फेगडे यांनी श्री गणेशलालजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्य डॉ. फेगडे यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या आतापर्यंतच्या प्रगतीविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. मंजुश्री गुंजेगावकर यांनी केले. रोहन देसाई (आयबीएम पार्टनरशिप असोसिएट, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन) यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयावर व्याख्यान झाले. सूत्रसंचालन प्रा. सुचिता खोत यांनी केले. प्रा. कल्याणी भालेकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांसाठी ‘हार्मफुल ड्रग ॲडिक्शन’, ‘व्हिडिओ मेकिंग’, ‘फूड सेफ्टी अँड अवेअरनेस, ‘पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. प्रा. स्वाती डने आणि प्रा. सविता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
(46567)
--
वाणिज्य विभागाची मुंबईतील एनएसईला भेट
- प्रा. निखिल खडीकर (इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स)
ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या वाणिज्य विभागातर्फे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मुंबई येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्टॉक एक्स्चेंजची प्रक्रिया समजून घेणे शैक्षणिक सहलीचा उद्देश होता. एनएसई अॅकॅडमीचे व्यवस्थापक व गुंतवणूक तज्ज्ञ सारंग राजहंस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनएसईचा प्रवास, कार्यपद्धती आणि राष्ट्रीय स्तरावरील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना एनएसईतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. वाणिज्य विभाग प्रमुख सीएमए डॉ. शोभा जगताप यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. तरिता शंकर आणि सीईओ डॉ. पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली एनईपीअंतर्गत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असे मत प्राचार्य डॉ. आनंद जुमळे यांनी व्यक्त केले. आयक्युएसी प्रमुख प्रा. राधिका गंधे, प्रा. विशाल कामठे, प्रा. उत्कर्ष बोरोडे, प्रा. नीलेश खळीकर व सुशांत हंडे यांनी संयोजन केले.
(46566)
--
रानभाज्या सहल आणि महोत्सव
(डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय)
रानभाज्यांचे आहारातील महत्त्व ओळखून त्यांचे आजूबाजूच्या जंगलात संगोपन आणि संवर्धन होऊन, जंगलं राखली जावीत या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या पुढाकाराने रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. यासाठी वनस्पती अभ्यासक प्रा. किशोर सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या गोळा केल्या. जवळच्या डोंगराळ
भागातील गोळा केलेल्या भाज्यांच्या विविध पाककृती मुलांनी दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात सादर केल्या. या भाज्यांमध्ये झेला, खडक अंबाडी, निवडुंग, तालिमखाना, करांदे, गोमटी, टाकळा, आघाडा, चिचू, दिंडा, भारंगी, चाई मोहर, रानकरडई, बाफळी, चिचुर्डा, भोवरी आणि कर्टुली अशा अनेक रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती सादर केल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी जंगली वनस्पतींच्या आंबट, कडू, तुरट, गोड अशा चवी अनुभवल्या. या रानभाज्या आहारातील महत्त्व, औषधी गुणधर्म, ओळख आणि पाककृती या विषयावर प्रा. किशोर सस्ते यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी वेगवेगळ्या रानभाज्यांचा वापर करून विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे रुचीरंजन केले. रानभाज्यांचा रंग वापरून पुलाव, विविध सरबते, पेय आणि चहा विद्यार्थ्यांनी केला होता. रानभाज्यांच्या विविध पाककृतींमध्ये वड्या, भजी, चाट, थालीपीठ, भाजी आणि रानमेवा लोणचे अशा विविध पाककृती सादर केल्या होत्या. प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र कांबळे, डॉ. शीतल कदम, प्रा. सपना निकम आणि प्रा. स्नेहा मेंढे उपस्थित होते. डॉ. सस्ते म्हणाले, ‘‘रसायनयुक्त भाजीपाल्याच्या वापरामुळे कर्करोगासारखे आजार लोकांना होत आहेत. निसर्गाच्या हानीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात आली आहे. रानभाज्यांच्या माध्यमातून शरीराला जीवनसत्वे, औषधी गुणधर्म आणि खनिजे मिळतात. रानभाज्यांच्या जनजागृतीमार्फत पश्चिम घाटातील डोंगर, टेकड्या आणि रान राखले जाईल आणि त्यामार्फत जैवविविधतेचे संगोपन आणि संवर्धन होण्यास मदत होईल.’’
(46568)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.