तळेगाव ते सोमाटणे फाटा रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

तळेगाव ते सोमाटणे फाटा रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १० : तळेगाव ते सोमाटणे फाटा या बायपास रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहेत. परिसरातील नागरिक या रस्त्याकडेला ओला-सुका कचरा टाकत असल्याने पावसामुळे कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच डास व माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळचा रस्ता असल्याने तळेगावातील व सोमाटणे फाटा येथील नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. त्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कचरा संबंधित विभागाने उचलावा, अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

PNE24U25063

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com