ज्येष्ठ नागरिकांकडून देशी वृक्षांची लागवड

ज्येष्ठ नागरिकांकडून
देशी वृक्षांची लागवड

पिंपरी, ता. ११ ः मोहननगर येथील शंकर शेट्टी उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
घोडके म्हणाले, ‘‘शहरांमध्ये विकास व पर्यावरण या गोष्टीचा कसा समतोल राखला जाईल, या दृष्टिकोनातून गांभीर्याने महापालिका विचार करत आहे.’’ मोहननगरचे ज्येष्ठ नागरिक कोठारी म्हणाले, ‘‘मनुष्य जन्माला आल्यानंतर एक झाड लावल्याशिवाय त्याला मरणाचा अधिकार नाही. जरी विद्युत वाहिनी वापरली तर वीज निर्माण करण्यासाठी पाणी लागते आणि पाणी येण्यासाठी पाऊस लागतो आणि पावसासाठी झाडे असावे लागतात त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने एक झाड तरी लावले पाहिजे.’’ त्यानंतर प्रकाश हगवणे म्हणाले, ‘‘देशी वृक्षांची जर लागवड केली तर ही झाडे या झाडांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन भूगर्भातील पाण्याचा साठा समतोल राखण्याचा ही झाडे उपयोगी पडतात. व त्यापासून शुद्ध ऑक्सिजन मिळतो.’’
अतिरिक्त आयुक्त रविकिरण घोडके, ऊद्यान अधीक्षक राजू वसावे, ज्येष्ठ नागरिक डॉ. प्रतिभा लोखंडे, पंढरीनाथ कर्जुले, गोरक्षनाथ गोल्हार, माजी नगरसेवक प्रकाश बाबर, विष्णू कराळे, विष्णू चावरिया, रमेश शर्मा, निरंजन आगरवाल, रमेश भोसले, दादासाहेब माने, संतोष डोंगरे, राज अवसारे, संपत देशमुख, धोंडिबा नामदे, खंडू बहिरवाडे, शशी इंगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल राऊत यांनी केले. महादू नेर्लेकर यांनी आभार मानले. महादेव नेर्लेकर यांनी विशेष परिश्रम यांनी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com