पासपोर्टबाबत अडवणूक होत असल्यास संपर्क साधा

पासपोर्टबाबत अडवणूक होत असल्यास संपर्क साधा
Published on

पिंपरी, ता. २७ : पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राबाबत अडवणूक अथवा दिरंगाई होत असल्यास तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ८०८७७०५११२ हा मोबाईल क्रमांक जारी केला आहे. पोलिस आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी बुधवारी (ता.२६) ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) यावर व्हर्चुअल टाउन हॉल मीटिंगचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध विषयांवर नागरिकांनी पोलिस आयुक्तांना थेट प्रश्न विचारले. पासपोर्ट पडताळणीच्यावेळी येत असलेल्या अडचणीबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी विशेष मोबाईल क्रमांक जारी केला आहे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. हा मोबाईल क्रमांक पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा दोन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हाताळला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com