समस्यांच्या निराकरणाची क्षमता सिद्ध करा - डॉ. प्रधान
पिंपरी, ता.९ ः ‘‘कार्पोरेट क्षेत्राच्या बदलणाऱ्या व नेहमी वाढत जाणाऱ्या अपेक्षा नवपदवीधरांनी आत्मसात केल्या पाहिजेत. वेळोवेळी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून जबाबदारी घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल,’’ असे मत पंतप्रधान कार्यालयाचे माजी अर्थ सल्लागार डॉ. प्रसाद प्रधान यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठातील उद्योग - विद्यापीठ संवाद केंद्राच्या माध्यमातून ‘पीसीयू इन्स्पिरा’ या इंडस्ट्री लीडर लेक्चर सिरीज अंतर्गत ‘जनरल अवेअरनेस ऑन कॉर्पोरेट रिक्वायरमेंट फ्रॉम फ्रेशर्स - कॅम्पस टू करिअर’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, मार्केटिंग हेड व समन्वयक जमीर मुल्ला, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अमित पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.
‘पीसीयू इन्स्पिरा’ उपक्रम हा विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव परिस्थितीची ओळख करून देण्यासाठी आणि करिअरमध्ये सक्षम बनवण्यासाठी राबवला जात असल्याचे डॉ.देसाई यांनी यावेळी सांगितले.
कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.