सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

पुनावळे भुयारी मार्गात पाणी
पुनावळे येथील अरुंद भुयारी मार्गातून पाणी बाहेर पडत असते. हा भाग चढाचा आहे. किमान तो भाग काढून आणि पाण्याबरोबर नेहमी वाहून येत असलेला राडारोडा, चिखल उचलून नेल्यास पाणी तुंबणार नाही. कृपया याची महापालिकेच्या संबंधित विभागाकडून अंमलबजावणी व्हावी.
- चंद्रकांत ढवळे, पुनावळे
PNE25V59176


टकलेनगरमध्ये अनियमित कचरा संकलन
पिंपळे निलखमधील टकलेनगरमध्ये कचरा घेऊन जाणारे वाहन बऱ्याचदा अगोदरच भरुन येत असल्याने नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागा राहत नाही. प्रमाणापेक्षा जास्त कचरा वाहनात भरला गेल्यास रस्त्याने सांडत जातो. त्यामुळे शक्यतो वाहन रिकामे पाठवावे. तसेच हे वाहन काही वेळा नियमित येत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीचे दखल घ्यावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V59180

दत्त मंदिर रस्त्यावरील राडारोडा हटवा
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावरच्या पोस्टल कॉलनीजवळ सिमेंटचे दुभाजक अनेक महिन्यांपासून बेवारस स्थितीत रस्त्यावर पडून आहेत. त्याच्या भोवती कचरा, घाण, चिखल, टाकाऊ साहित्य आहेत. अतिशय वाहतुकीचा, गर्दीचा हा रस्ता आहे. मात्र या दुभाजकामुळे वाहतुकीस अडचण होत आहेत. वारंवार कळवून पण महानगरपालिकेतून उपाय केले जात नाहीत. नागरिक त्रस्त आहेत. अपघात होत आहेत. कचरा, घाणी मुळे आरोग्य विघातक रोगराई वाढत आहेत. अडथळे, टाकाऊ, भंगार साहित्य, बेवारस वाहने, राडारोडा, पाईप हटवून रस्ता स्वच्छ करून वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात यावा.
- दिलीप बाफना, वाकड
PNE25V59182

मुकाई चौकातील सिग्नल सुरू करा
​गेल्या काही दिवसांपासून मुकाई चौक, किवळे चौकातील वाहतूक सिग्नल पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी आणि सायंकाळी कामाच्यावेळी वाहतूक विस्कळीत होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हा चौक मुख्य मार्गावर असल्याने आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने वेगाने येतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक झाले आहे. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुकाई चौकातील बंद असलेला वाहतूक सिग्नल तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करावा. तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी किमान ‘पीक अवर्स’मध्ये वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी.
- निर्गुण थोरे, किवळे
PNE25V59178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com