महापालिका प्रशासनाला नागरी समस्यांचे वावडे ः आमदार गोरखे

महापालिका प्रशासनाला नागरी समस्यांचे वावडे ः आमदार गोरखे
Published on

पिंपरी, ता. १८ : महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरी समस्या सुटत नसल्याची खंत व्यक्त विधान परिषदेचे आमदार गोरखे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे व्यक्त केली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासमवेत महापालिकेत नुकतीच बैठक घेतली. यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, शीतल शिंदे, राजेश पिल्ले, शैलेश मोरे आदी व अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळात नागरी समस्या सुटत नाहीत. पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. वाहतुकीची मोठी समस्या आहे. झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाची कामे वेळेवर केली जात नाहीत. बीआरटीमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे, अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे. तसेच आगामी आर्थिक वर्षात पिंपरी मतदारसंघासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.
PNE25U89813

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com