

पिंपरी, ता. ४ ः निगडी ते दापोडीदरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील समतल विलगकामधून (ग्रेड सेपरेटर) बाहेर पडण्यासाठी (आउट मर्ज) आणि आत जाण्यासाठी (इन मर्ज) असलेल्या रस्त्याचे महापालिकेच्या वतीने पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षी मेमध्ये सुरू करण्यात आले. गेल्या दहा महिन्यात केवळ निगडी पवळे ब्रीज अगोदर असलेला बाहेर पडण्याच्या ठिकाणी आणि आत जाण्याच्या ठिकाणी काम पूर्ण झाले. महापालिकेच्या कासवगतीने सुरु असलेल्या कामाचा वाहनचालकांना फटका बसत असून मर्ज इन-आउट रस्त्यावर अपघात होत आहेत.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निगडी ते दापोडीदरम्यान ११ किलोमीटरचे तीन ग्रेड सेपरेटर, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाणपूल बांधण्यात आले. यामुळे विनाअडथळा प्रवास करत अगदी कमी वेळात दापोडीपर्यंत जाता येते. या मार्गावरील ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी आउट मर्ज आणि आत जाण्यासाठी इन मर्ज दिला आहे. मात्र, हे मर्ज इन-आउट सोयीचे ठरण्याऐवजी अपघातांचे कारण ठरत आहेत. मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी मर्ज इन-आउटमध्ये बदल करण्यात आले होते, तर काही बंद करण्यात आले होते. इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज केल्याने वाहनचालक थेट बाहेर पडतात अन् अपघात होत आहेत. महापालिकेने मे मध्ये मर्ज इन-आउट पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली. निगडी येथील पवळे ब्रीजच्या सुरुवातीला मर्ज आउटच्या ठिकाणी मर्ज इनचे काम केले. या एकाच ठिकाणचे काम केल्यानंतर इतर ठिकाणी पुनर्बांधणीचे काम सुरूच करण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरासमोरील इन मर्जचे आउट मर्ज करण्याचे काम सुरु आहे. मात्र, तेही संथ गतीने सुरु आहे.
----------
निगडी ते दापोडी
अंतर ः ११ किलोमीटर
आउट मर्ज ः १० ठिकाणी
इन मर्ज ः ८ ठिकाणी
इन-आउट मर्ज ः ६ ठिकाणी
-----------
येथे होणार काम
आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरासमोरील इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज करणार
चिंचवड स्टेशनच्या पुढे गंगानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगोदर आउट मर्ज करणार
चिंचवडकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर डीमार्ट शेजारी असलेल्या इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज करणार
सीटी मॉलसमोरील आउट मर्जच्या ठिकाणी इन मर्ज करणार
-------------
आउट मर्ज आणि इन मर्जच्या पुनर्बांधणीचे काम अर्बन स्ट्रीटचे काम करणाऱ्या विकासकाला दिले आहे. त्यांना चार ठिकाणचे डिझाइन अंतिम करून दिले आहे. आणखी काही ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.