सदनिका गळतीसह किरकोळ दुरुस्ती करा ‘पीएमआरडीए’च्या सदनिकांबाबत तपासणीनंतर सूचना
पिंपरी, ता. ४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत उभारलेल्या सदनिकांमध्ये पाणी गळतीची समस्या आहे. तसेच काही किरकोळ दुरुस्ती देखील असल्याने त्या दुरुस्ती करण्याच्या सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. ‘पीएमआरडीए’च्या विविध प्रकल्पांची बांधणी सुरू आहे. मात्र, काही गृहप्रकल्पाबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. या प्रकल्पाचा दर्जा आणि बांधकाम स्ट्रक्चर तपासणी बाबत आयुक्त योगेश म्हसे यांनी आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकल्पाचा सीओईपी ( कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) अहवाल प्राप्त झाला असून, त्यात गळती सोबत किरकोळ दुरुस्त्या सुचविल्या आहेत.
पेठ क्रमांक १२ भोसरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोनमध्ये जवळपास साडेचार हजार सदनिकांची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पात सदनिकेतील स्वच्छतागृह, शौचालय, छत, सोलर वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन यामध्ये अनेक समस्या पुढे आल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी छत गळत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाले होत्या. ठिकठिकाणी स्लॅब देखील निखळून पडण्याच्या घटना घडल्या. नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पातील नेमके कोणते दोष आहेत. याची तपासणी करण्याचे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले होते.
त्यानुसार गळती होणारी ठिकाणे, सदनिकांमध्ये कोणत्या दुरुस्ती कराव्या लागणार आहेत, याचा अहवाल पीएमआरडीए प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. येत्या आठ दिवसांत सुचवलेली कामे पूर्ण होतील. त्याबाबत वारंवार आढावा घेत आहे, अशी माहिती आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

