बस ठेकेदाराच्या, निगराणी एसटीकडून

बस ठेकेदाराच्या, निगराणी एसटीकडून
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी बसस्थानक परिसरातील कालबाह्य जुन्या बसगाड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यानंतर चार शिवशाही बसगाड्या दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत आणण्यात आल्या आहेत. या बस खासगी ठेकेदाराच्या असून, अनेक वर्षांपासून त्याची निगराणी एसटी महामंडळच करत होते.
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ७९२ ‘शिवशाही’ बसगाड्यांपैकी बहुतांश खासगी ठेकेदाराच्या आहेत. तर, काही ‘शिवशाही’ राज्यातील विविध आगारांत बंद अवस्थेत आहेत. स्वारगेट आगारातही अनेक वर्षांपासून अशा चार बसगाड्या बंद अवस्थेत होत्या. दरम्यान, स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आगारातील कालबाह्य बसगाड्यांची तपासणी केली. तेव्हा त्यात आक्षेपार्ह वस्तू आढळल्या होत्या. त्यामुळे ते एसटी स्थानक आहे, की अवैध कामांचे ठिकाण असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. या घटनेनंतर सरनाईक यांनी कालबाह्य बसगाड्यांच्या विल्हेवाटीचे आदेश दिले. त्यानंतर पुणे एसटी विभागाने स्वारगेट येथील जुन्या शिवशाही बसगाड्या दापोडी येथे आणल्या आहेत. आता या बस आणखी किती दिवस पडून राहणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
---------
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने स्वारगेट आगारातील शिवशाही बस दापोडी कार्यशाळेत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्या ठेकेदाराच्या असल्या, तरी आरटीओची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांचा लिलाव केला जाईल.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com