सार्वजनिक आरोग्य सेवेत उद्योगनगरी प्रथम राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचा अहवाल प्रसिद्ध; महापालिकेला ९२ गुण
पिंपरी, ता. ४ ः कुटुंब कल्याण, माता व बाल संगोपन, लसीकरण आदी सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महापालिकेचे ‘वायसीएम’सह आठ रुग्णालये, ३० दवाखाने आहेत. आपला दवाखाना आणि जिजाऊ क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. शिवाय, आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विभागाने मातृ व बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यांपूर्वी प्रसूतिपूर्व नोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण आणि आयएफए गोळ्यांचे वितरण; बाल आरोग्य सेवांअंतर्गत नवजात बालकांची नोंदणी, नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम व शस्त्रक्रिया नियोजन, पीपीआययूसीडी बसवण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर, गरोदर महिलांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यावर भर आदी विविध उपक्रम राबविले आहेत. या आधारावर एक एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंतचा आढावा घेऊन राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.
महापालिकेच्या पुढील योजना
- बर्न वॉर्ड, कॅन्सर हॉस्पिटल, आपला दवाखाना, डिजिटल हेल्थ सोल्यूशन्स, आरोग्य केंद्र डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीशी जोडणे
- स्मार्ट हेल्थ ट्रॅकिंग, नागरिकांच्या आरोग्य डेटाचे डिजिटल विश्लेषण, आरोग्य केंद्रांचा विस्तार करणे
- झोपडपट्टी व दूरवरच्या भागात नवीन आरोग्य केंद्रे सुरू करणे, लसीकरण आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांना अधिक गती
- मातृ व बाल आरोग्यासाठी अतिरिक्त योजनांचा आराखडा तयार करून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे
‘‘महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनास राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याचा अभिमान आहे. भविष्यात अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

