प्रस्‍तावित वीज दरवाढ नुकसानकारक

प्रस्‍तावित वीज दरवाढ नुकसानकारक
Published on

पिंपरी, ता. ४ : ‘‘महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने विरोध केला आहे. या दरवाढीमुळे अनेकांचे नुकसान होणारे आहे. त्‍यामुळे ही दरवाढ रद्द करावी,’’ अशी मागणी संघटनेने केली आहे.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी याबाबतची भूमिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आहे.
‘‘अन्य राज्यांचा विचार करता, महाराष्ट्रात विजेचे दर सर्वाधिक आहेत. आता पुन्हा महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे खुल्या, छुप्या पद्धतीने वीज दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्याचे शासनधोरण असताना महावितरण मात्र वारंवार वीज दरवाढ करत आहे. वीज चोरी-गळती, विद्युत निर्मिती, प्रकल्पांची कार्यक्षमता, प्रशासकीय खर्च, खासगी कंपन्याकडून वीज विकत घेण्याचे दर आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर महावितरण कंपनीने लक्ष द्यावे. यंत्रणा सुधारून कार्यक्षमता वाढवावी आणि आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. पण, त्या सर्व विषयांकडे डोळेझाक करून वारंवार वीज दरवाढ करणे, हा उपाय घातक आहे,’’ असे संघटनेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com