आमदार अबू आझमींसारख्या प्रवृत्तीला ठेचून काढा आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात संताप

आमदार अबू आझमींसारख्या 
प्रवृत्तीला ठेचून काढा  
आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात संताप
Published on

पिंपरी, ता. ४ : मुघल सम्राट औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासमोर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भीक मागितली होती. त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण काय करता? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यासारख्या प्रवृत्तींना सभागृहात आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (ता. ४) विधिमंडळ सभागृहात व्यक्त केला.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली होती. त्याच्या निषेधार्थ आमदार लांडगे म्हणाले, ‘‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना हाल हाल करून मारले. त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करताना अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध लोकप्रतिनिधीला लाज कशी वाटत नाही? तुमचा जन्म केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी झालेला आहे.’’
दरम्यान, अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर महायुतीच्या समविचारी आमदारांनी आज आंदोलन केले. यावेळी अबू आझमी यांनी माफी मागावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा...
अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. प्रखर हिंदुत्वाचा विचार व विकासाचा संकल्प आणि स्वप्न घेऊन काम करणारे माझे हिंदुत्ववादी महायुती सरकार या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मी या निमित्ताने सभागृहासमोर करणार आहे, असा घणाघातही आमदार महेश लांडगे यांनी केला.
फोटोः 95154

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com