पिंपरीच्या संत तुकारामनगरातील अमर स्मृती उद्यानात वृक्षतोड
पिंपरी, ता. ९ : संत तुकारामनगरमधील अमर स्मृती उद्यानात कारगिल युद्धातील हुतात्मा सैनिकांच्या नावाने १९ झाडे लावण्यात आली होती. या झाडांची महापालिकेने तोडणी केल्याने परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निंदनीय प्रकाराविरोधात नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. परंतु अद्यापही याबाबत दखल घेण्यात आली नाही.
कारगिल युद्धात राज्यातील अनेक जवानांना वीरमरण आले. प्रत्येकाच्या मनात त्यांच्या अमर स्मृती मनात तेवत राहाव्यात म्हणून संत तुकारामनगर येथील नागरिकांनी सैनिक कल्याण मंडळाकडून राज्यातील हुतात्मा सैनिकांची नावे मिळविली. अमर स्मृती उद्यान उभारून त्यांच्या नावाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. मात्र, महापालिकेने त्या वृक्षांची तोडणी केल्याने नागरिकांची मने दुखावली गेली आहेत. उद्यानाला लावलेला अमर स्मृती फलक काढण्यात आला. माजी नगरसेवक वसंत शेवडे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हा प्रकार उद्यान विभाग, स्थापत्य विभाग आणि आयुक्तांनाही निवेदनाद्वारे निर्दशनास आणून दिला. मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नाही. हुतात्मा सैनिकांच्या नावे पुन्हा वृक्षांची लागवड करून नामफलक बसविण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक शेवडे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

