महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
‘ई-कॉमर्स महिला सक्षमीकरण’ उपक्रम
पिंपरी ः राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग तसेच आयसीएमआर डुडुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ई-कॉमर्स महिला सक्षमीकरण’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली. या परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, संस्थेच्या विश्वस्त शुभांगी विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, डॉ. धनंजय बागूल यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. पराग काळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. तर राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शुभांगी विक्रांत लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. परिषदेतील प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. एस.एन. निंबाळकर, प्राचार्य डॉ. महिंद्र अवघडे, डॉ. यशोधन म्हेत्रे, प्रा. सचिन चव्हाण, डॉ. बसवराज कुडचिमठ, आणि डॉ. कामिनी शहा यांचा समावेश होता. महाविद्यालयातील डॉ. प्रगती गोरे, प्रा. जयश्री अरमानी, प्रा. सुनील दांडेकर, डॉ. सुग्रीव आडळ आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी आयोजन केले होते. वैशाली गव्हाणे आणि प्राचार्य डॉ. सतीश पवार यांनी उपस्थित होते. प्रा. अनिल गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रगती गोरे यांनी आभार मानले. सहसंयोजक प्रा. सुनील दांडेकर, समन्वयक प्रा. जयश्री अरमानी, सचिव डॉ. सुग्रीव आडाल यांनी यशस्वीरीत्या आयोजन केले.
महिला बचत गटांचा सन्मान
पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शहरातील महिला बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी नगरसेविका उषा मुंढे, अनुराधा गोरखे, अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे, सहायक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे आदींसह महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, ‘‘शहरातील महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महापालिकेने यंदा ८३ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. महापालिका सक्षमा प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना सक्षम करत आहे.’’ माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या, शिक्षणाची आवड असणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.’ असा सल्लाही यावेळी उपस्थित महिलांना दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हभप नेहा महाराज भोसले यांचे कीर्तन झाले. सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक तसेच पोर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांनी आभार मानले.
96312
कर्करोग विषयी मार्गदर्शन शिबिर
पिंपरी ः महिलांमध्ये कर्करोगाचे वाढणारे प्रमाण, कर्करोगाचे प्रकार, त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी याविषयी माहिती देणाऱ्या व कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व लाइफ पॉइंट रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयपाल रेड्डी यांनी उपस्थित महिलांना सभासदांना मार्गदर्शन केले. तर डॉ. मृणाल फोंडेकर यांनी महिलांना आहाराविषयी माहिती दिली. कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. मोहन गायकवाड, आनंद पाथरे, नम्रता बांदल, प्रिया पुजारी, सायली सुर्वे, संध्या स्वामी, सुनंदा निकरड, रंजना जोशी, जयवंत सूर्यवंशी, मीनाक्षी मेरुकर, रोहित मोरे, आनंद पुजारी, श्वेता मोरे, जयेंद्र मुरूमकर यांनी आयोजन केले.
शंभर महिला ई-ऑटो रिक्षा चालकांचा सन्मान
पिंपरी ः महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण
करण्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांचा सहभाग वाढवणार आहे, असा संकल्प पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष आशा कांबळे यांनी केला. जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटो प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. यावेळी आशा कांबळे बोलत होत्या. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ऑटो क्लस्टर महिलांनी पिंक रिक्षा फेरी काढली. कार्यक्रमात इतर देशातील तसेच राज्यातील प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते. यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक, टेम्पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे, इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलचे अध्यक्ष डॉ. एस. के. सरोज, अध्यक्ष डॉ. राजीव मिश्रा, डॉ. दीपक वाधवा, श्रीनिवास कुमार, एमएसएमइचे केंद्र सरकार लघुउद्योग विभागाचे के. के. गोयल, डॉ. कल्याण हट्टी आदी उपस्थित होते. इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलचे अध्यक्ष डॉ. एस. के. सरोज म्हणाल्या, केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान द्यावे. तसेच, दुर्बल घटकातील १०० महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढून त्यांना शंभर रिक्षा देण्याचा उपक्रम घरकाम महिला सभा आणि बाबा सामाजिक फाउंडेशनने राबविला. पुढे एक हजार महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा संकल्प असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले.
६३२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

